Skip to main content

Posts

आजी

                        आजी म्हटल्यावर काय येत डोळ्यासमोर ? एक नउवार चापूनचोपून नेसलेली, केसांचा अंबाड़ा त्यात एखाद फूल, कानात कुड्या, हातात हिरवा चूड़ा, दोन पाटल्या, कमरेत चाव्यांचा जुड़गा, पायात जोडव्या,चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत आपल्या पाखरांची वाट आणि खुप माया. माझी आजी अगदी अशीच होती. खुप कमालीची आणि नेहमी हसतमुख.  मी कधीही तिला थकलेली पहिलीच नाही. सतत कामात आणि तरीही अगदी शांत.        आम्ही लहानपणी जेव्हा गावाला जायचो , मे महिन्यात तेव्हा एसटी तुन उतरल्या उतरल्या आम्ही आजीच्या घरापर्यंत ओरडत धावतच सुटायचो. मी तिला कायम घराच्या खिडकीतच पहायचे, जणू काही  मागच्या मे महिन्यापासून   ती आमच्या वाटेकडे डोळे लावून तिथेच उभी आहे की काय? घरात शिरल्यावरची तिची ती उबदार मिठी अजूनही अंगावर का टा आणते. घरी ती आम्हाला नाहुमाकू घालायची, आम्ही येणार म्हणून मुद्दाम आणलेली खारी,अंगणात मुद्दाम बांधलेला झोपाळा,आमच्यासाठी केलेला फुलांचा गजरा, तिने आमच्यासाठी शिवलेली गोधडी जिची ऊब आज...
Recent posts

गरज

  गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity .  महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल ..  चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ...  माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर.     खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या M...

समांतर रेषा

समांतर रेषा          "आमच आयुष्य समांतर रेषा बनून राहिलय." अंशु फोन वर असच काहीतरी बोलली. आजच्या बिजी सिटी लाइफ मधे कपल्स ना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. प्रत्येकजण आपपला संसार वेगळा थाटतो. बहुतेकदा ते सोइच असत, पण वेगळ रहिल्यावर जवाबदारी दोघांवर असते. रेंट किवा emi, मेंटेनेंस , किराना सामान, आउटिंग , शॉपिंग , गेट टुगेदर ,पेपर,दूध, फ़ोन बिल , लाइट बिल,घरी कामला बाई असेल तर ते एक  .... या सगळ्यासाठी दोघांना कमावण भाग आहे. ऑफिस मधली जीवघेणी रैट रेस तर असतेच. "वेळ मिळत नाही. " खर आहे. आपणच आपल्या आयुष्याचा गुंता इतका वाढवला आहे की तो आता सुटता सुटत नाहीये.           नवरा बायकोच आयुष्य समांतर रेषा बनलय , ऐकमेकासोबत पण आपापल्या रस्त्यांवरून. संगत आणि सोबत यात फरक आहे, नाही का? आजकल एकमेकासंगे पेक्षा एकमेकांसोबत जास्त सोईच झालय. we need our space.  आपण एकसाथ चालतो, हसतो, रडतो, वेळप्रसंगी रागावतो  सुद्धा . आपण एकत्र येतो  सुख अनुभवतो आणि त्यानंतर आपण हे आपण होवून जातो. तू तुझ्या बाजूला मी माझ्या.  आप...

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी"       माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ...       शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्...

माझ घर तुला घे.

      आपल्या सुपर बिझी "सिटी" लाईफ मधे आपण इतके  अडकलेले  आहोत की आपल्या शिवायही काही पशुपक्षी  आपल्याच  सोबत राहतात हे  आपण विसरत चाललो आहोत. इवलेसे ते जिव, काँक्रीट च्या जंगलात इकडून तिकडे  भटकत असतात. काही जास्तीच्या अपेक्षा नसतात. ना अलिशान घरे हवी असतात ना फिरायला गाड्या ना कॉसमेटीक  ना कपडे आणि नाही पैसा. आपल्यात जर काही कॉमन आहे तर भूक आणि झोप.     काही दिवसा पुर्वी मी क्रौफीड मार्केट  गेले होते. तिथे नेहेमीच फार गोंडस प्राणी-पक्षी असतात. एकीकडे वाईट ही वाटतं, त्याना पिंजऱ्यात पाहून, पण मग ते कोणाच्या तरी घरी जाऊन छान लाडात राहतील म्हणून स्वताची समजूत करून घेते. त्या दिवशी तिथे पक्षांसाठी Water feeder bottle आणि Bird feeder  पाहिल, वाटलं चला ट्राय करून बघूयात.दोन्ही वस्तू घेऊन रात्री घरी आले. आल्यावर आधी बॉटल  धुवून पुसून त्यात दाणे आणि पाणी भरून ठेवले. सकाळी उठल्यावर पहिल काम म्हणजे माझ्या खिडकीत, त्या दोन्ही बॉटल ठेवून दिल्या आणि मग काय सुरु झाला वेटिंग गेम…  आठ वाजले, नऊ, साडे नऊ,...
हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. .