Skip to main content

Posts

Showing posts from 2016

समांतर रेषा

समांतर रेषा          "आमच आयुष्य समांतर रेषा बनून राहिलय." अंशु फोन वर असच काहीतरी बोलली. आजच्या बिजी सिटी लाइफ मधे कपल्स ना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. प्रत्येकजण आपपला संसार वेगळा थाटतो. बहुतेकदा ते सोइच असत, पण वेगळ रहिल्यावर जवाबदारी दोघांवर असते. रेंट किवा emi, मेंटेनेंस , किराना सामान, आउटिंग , शॉपिंग , गेट टुगेदर ,पेपर,दूध, फ़ोन बिल , लाइट बिल,घरी कामला बाई असेल तर ते एक  .... या सगळ्यासाठी दोघांना कमावण भाग आहे. ऑफिस मधली जीवघेणी रैट रेस तर असतेच. "वेळ मिळत नाही. " खर आहे. आपणच आपल्या आयुष्याचा गुंता इतका वाढवला आहे की तो आता सुटता सुटत नाहीये.           नवरा बायकोच आयुष्य समांतर रेषा बनलय , ऐकमेकासोबत पण आपापल्या रस्त्यांवरून. संगत आणि सोबत यात फरक आहे, नाही का? आजकल एकमेकासंगे पेक्षा एकमेकांसोबत जास्त सोईच झालय. we need our space.  आपण एकसाथ चालतो, हसतो, रडतो, वेळप्रसंगी रागावतो  सुद्धा . आपण एकत्र येतो  सुख अनुभवतो आणि त्यानंतर आपण हे आपण होवून जातो. तू तुझ्या बाजूला मी माझ्या.  आपली पिढी खूप प्रक्टिकल आहे. कोणाच्यात किती गुंतायच हे फार चांगल कळत. म

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी"       माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ...       शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. एक वेगळीच मजा असते एक वेगळच  आपलेपण असत, आणि अचानक मन लहानपणी च्या आठवणीत रमायला लागत. आठवण

माझ घर तुला घे.

      आपल्या सुपर बिझी "सिटी" लाईफ मधे आपण इतके  अडकलेले  आहोत की आपल्या शिवायही काही पशुपक्षी  आपल्याच  सोबत राहतात हे  आपण विसरत चाललो आहोत. इवलेसे ते जिव, काँक्रीट च्या जंगलात इकडून तिकडे  भटकत असतात. काही जास्तीच्या अपेक्षा नसतात. ना अलिशान घरे हवी असतात ना फिरायला गाड्या ना कॉसमेटीक  ना कपडे आणि नाही पैसा. आपल्यात जर काही कॉमन आहे तर भूक आणि झोप.     काही दिवसा पुर्वी मी क्रौफीड मार्केट  गेले होते. तिथे नेहेमीच फार गोंडस प्राणी-पक्षी असतात. एकीकडे वाईट ही वाटतं, त्याना पिंजऱ्यात पाहून, पण मग ते कोणाच्या तरी घरी जाऊन छान लाडात राहतील म्हणून स्वताची समजूत करून घेते. त्या दिवशी तिथे पक्षांसाठी Water feeder bottle आणि Bird feeder  पाहिल, वाटलं चला ट्राय करून बघूयात.दोन्ही वस्तू घेऊन रात्री घरी आले. आल्यावर आधी बॉटल  धुवून पुसून त्यात दाणे आणि पाणी भरून ठेवले. सकाळी उठल्यावर पहिल काम म्हणजे माझ्या खिडकीत, त्या दोन्ही बॉटल ठेवून दिल्या आणि मग काय सुरु झाला वेटिंग गेम…  आठ वाजले, नऊ, साडे नऊ, दहा, अकरा … एकही चिमणी आली नाही . मी थोडी निराशच झाले. आपल्या इंन्स्टट लाइफ मधे सगळ
हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. .