Skip to main content

Posts

Showing posts from July, 2017

आजी

                        आजी म्हटल्यावर काय येत डोळ्यासमोर ? एक नउवार चापूनचोपून नेसलेली, केसांचा अंबाड़ा त्यात एखाद फूल, कानात कुड्या, हातात हिरवा चूड़ा, दोन पाटल्या, कमरेत चाव्यांचा जुड़गा, पायात जोडव्या,चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत आपल्या पाखरांची वाट आणि खुप माया. माझी आजी अगदी अशीच होती. खुप कमालीची आणि नेहमी हसतमुख.  मी कधीही तिला थकलेली पहिलीच नाही. सतत कामात आणि तरीही अगदी शांत.        आम्ही लहानपणी जेव्हा गावाला जायचो , मे महिन्यात तेव्हा एसटी तुन उतरल्या उतरल्या आम्ही आजीच्या घरापर्यंत ओरडत धावतच सुटायचो. मी तिला कायम घराच्या खिडकीतच पहायचे, जणू काही  मागच्या मे महिन्यापासून   ती आमच्या वाटेकडे डोळे लावून तिथेच उभी आहे की काय? घरात शिरल्यावरची तिची ती उबदार मिठी अजूनही अंगावर का टा आणते. घरी ती आम्हाला नाहुमाकू घालायची, आम्ही येणार म्हणून मुद्दाम आणलेली खारी,अंगणात मुद्दाम बांधलेला झोपाळा,आमच्यासाठी केलेला फुलांचा गजरा, तिने आमच्यासाठी शिवलेली गोधडी जिची ऊब आजही तशीच आहे. सार काही मनाच्या एक स्पेशल कोरीव बॉक्स मधे जसच्या तसं आहे. तिने केलेली चुलीवरची भाकरी वर लोण्याची धार