Skip to main content

आजी

                    

   आजी म्हटल्यावर काय येत डोळ्यासमोर ? एक नउवार चापूनचोपून नेसलेली, केसांचा अंबाड़ा त्यात एखाद फूल, कानात कुड्या, हातात हिरवा चूड़ा, दोन पाटल्या, कमरेत चाव्यांचा जुड़गा, पायात जोडव्या,चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यांत आपल्या पाखरांची वाट आणि खुप माया. माझी आजी अगदी अशीच होती. खुप कमालीची आणि नेहमी हसतमुख. मी कधीही तिला थकलेली पहिलीच नाही. सतत कामात आणि तरीही अगदी शांत. 
      आम्ही लहानपणी जेव्हा गावाला जायचो , मे महिन्यात तेव्हा एसटी तुन उतरल्या उतरल्या आम्ही आजीच्या घरापर्यंत ओरडत धावतच सुटायचो. मी तिला कायम घराच्या खिडकीतच पहायचे, जणू काही मागच्या मे महिन्यापासून  ती आमच्या वाटेकडे डोळे लावून तिथेच उभी आहे की काय? घरात शिरल्यावरची तिची ती उबदार मिठी अजूनही अंगावर काटा आणते. घरी ती आम्हाला नाहुमाकू घालायची, आम्ही येणार म्हणून मुद्दाम आणलेली खारी,अंगणात मुद्दाम बांधलेला झोपाळा,आमच्यासाठी केलेला फुलांचा गजरा, तिने आमच्यासाठी शिवलेली गोधडी जिची ऊब आजही तशीच आहे. सार काही मनाच्या एक स्पेशल कोरीव बॉक्स मधे जसच्या तसं आहे. तिने केलेली चुलीवरची भाकरी वर लोण्याची धार, वांग्याची भाजी केव्हा झणझणीत सुकट. ह्या सगळ्यांची चव अजूनही रेंगाळते आहे जिभेवर. देवापुढे दिवा लावून आमच्याकडून शुभंकरोति हट्टानी म्हणून  घ्यायची. 
         संध्याकाळी तुळशी वृंदावनसमोर दिवा लावणारी माझी आजी तीच ते मोहक रूप अजूनही डोळ्यासमोरुन जात नाही. रात्रीच्या गावातल्या भयंकर अंधारात आम्ही तिचा पदर पकडून तिच्या मागे मागे असायचो, आणि ती नुसतीच हसायची पण खरतर तिला हे आवडायच. बाईचे  कसे वेगवेगळे वर्जन असतात, ती लहानपणी जस वागते ते एक प्रेमात पडल्यावर अजून थोड़ मचुअर लग्नानांतर तर मचुरिटी च्या एज ला आई झाल्यावर पूर्ण जवाबदार (मुलांच्या बाबतीत तरी 😁  ) आणी  आजी झाल्यावर जवाबदार च्या पलीकडे.  कुठून येत हे शहाणपण ? कोण शिकवत असेल हे ? बीइंग अ वूमेन आय एम स्टील फाइंडिंग दिस... आई असताना कठोऱ असणारी, आजी झाल्यावर कोमल कशी होते?                 
           माझ्या आजीच्या घराबाहेर गुलाबच मोठ झाड़ होत. (हो, झाड़च कारण ते झाड़ाएवढ मोठ होत ) आजी-आजोबा काश्मीर ला गेले असताना आजीने हट्टान ते रोप घेतल होत. त्या गुलाबला एका वेळी किमान ७ ते ८ गुलाब यायचे. आई सांगते ते गावठी गुलाब होत, पण त्या गुलाबाचा सुगंध आजतागायत मला कुठेही मिळाला नाही. आपल्या सिटी लाइफ मधे बऱ्याच मॉल मधे त्या सुगंधाचा परफ्यूम मिळतो का म्हणून आजही शोधात फिरत असते पण अजुन ही नाही सापडला तो सुगंध. " खरच तो सुगंध गुलाबाचा होता की आजीच्या मायेचा होता ? तिच्या प्रेमाचा ? की तिच्या आठवणींचा ? " आजी गावावरुन आमच्या घरी येताना आठवणीने गुलाबाची फूले  आणायची. विशेष म्हणजे नंतर जेव्हा ती आजारी पडली तेव्हापासून झाड़ मलूल पडल. पुढे तीच आजारपण  वाढत गेल आणि एकाएकी झाडावर गुलाब येईनासे झाले. ती ज्यादिवशी गेली फेब्रुवारी मधे तेव्हा झाड़ही गेल. हे अस कस? हे न सुटलेल कोड़ आहे.
          माहीत नाही आपल्या नातवंडाना नऊवारी मधील आजी बघायला मिळेल की ती आता फ़क्त फोटोतच....  त्यांना त्या गोधडीची ऊब, तुळशी वृंदावनासमोरच्या त्या  दिव्याच मोहक रूप, शुभंकरोति ची गोड़ी, गावतला अंधार, अंधरातली नसलेली भुत,आजीच ते कौलारु घर , आपल्यासाठी बांधलेला दोरीचा झूला,शेणानी सारवलेल अंगण आणि आजीच्या अंगणातला गुलाब... ह्या साऱ्याची मजा कधी कळणारच नाही. 
     आज आजी ही एक सुंदर आठवण आहे." त्या गुलाबाच्या सुगंधासारखी , हरवलेली तरीही जिवंत. "

Comments

Popular posts from this blog

गरज

  गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity .  महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल ..  चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ...  माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर.     खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या MIL ना (mother in law हो ! )  शहरात नवीन काही
हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. . 

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी"       माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ...       शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. एक वेगळीच मजा असते एक वेगळच  आपलेपण असत, आणि अचानक मन लहानपणी च्या आठवणीत रमायला लागत. आठवण