Skip to main content

गरज

  गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity .  महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल ..  चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ...  माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर.
    खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या MIL ना (mother in law हो ! )  शहरात नवीन काहीही झाल की पहिल्याच दिवशी विजिट द्यायची सवय आहे. बघायला म्हणून जातात आणि नक्कीच काहीतरी घेवून येतात.  मागच्या वर्षी घराच्याजवळ PNG jewellers ओपन झाल, माधुरी बघायला जाऊ म्हणून मला नेल आणि चक्क खरेदीच केली. MIL चा शॉपिंग साठी हाथ ढीला असतो त्याउलट माझ्या आईचा स्वाभाव ... अशावेळी मला प्रश्न पडतो "गरजांसाठी जगाव ? की गरजेपुरत जगाव ?"  काल मीही विनाकारण काही वस्तु विकत घेतल्या जस की उगाचच घेततेला महागडा परफ्यूम ( तो ही असलेली १ बाटली संमपतच नाही म्हणून )  हैंड सॅनिटायजर वाइप्स , फेस क्रीम , साबण , मॉइस्चराइजर etc आणि अचानक डोक्यात प्रश्न पडला do i really need this ? खरच गरज आहे की केवळ अमुक नटी हेच लावते किवा  माझ्या फेवरेट ब्लॉगर नी या प्रोडक्ट ला ५ पैकी ५ रेटिंग दिलय म्हणून आपणही वापरून पहाव.  कदाचित प्रेस्टीज ईशू. हो! " आजकल गरज म्हणजे प्रेस्टीज ईशू झालय."
     शहरीकरणामुळे किंवा आपल्या लाइफस्टाइलच्या ह्या वाढत्या गरजा, गरज नसतानाही. एखादी वस्तू केवळ आकर्षक दिसतेय, सुगंधी  आहे, सेल वर कमी किमतीत मिळतेय, पुढे कधीतरी लागेल, आर्गेनिक अस लिहिलय म्हणून शहा
निशा न करता  आपण विकत घेतो. मॉल संस्कृतीमुळे तर बऱ्याच अनवान्टेड बट वान्टेड अश्या वस्तु घरी आणल्या जातात. बऱ्याचश्या गोष्टी अर्धवट वापरून धूळ खात असतात. मग एक्सपायर्ड होतात. खरच आपण वस्तूनसाठी आहोत की वस्तु आपल्यासाठी ?
      मी अस नाही म्हणणार की विनाकारण वस्तु घेवु नका,हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे  पण ह्या आपल्या वाढत्या गरजावर विचार नक्की करा. गराजवंताला अक्कल नसते अस म्हणतात पण विनाकारणाच्या गराजवंताचं काय ?

Comments

Popular posts from this blog

हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. . 

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी"       माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ...       शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. एक वेगळीच मजा असते एक वेगळच  आपलेपण असत, आणि अचानक मन लहानपणी च्या आठवणीत रमायला लागत. आठवण