Skip to main content

Posts

Showing posts from June, 2016

समांतर रेषा

समांतर रेषा          "आमच आयुष्य समांतर रेषा बनून राहिलय." अंशु फोन वर असच काहीतरी बोलली. आजच्या बिजी सिटी लाइफ मधे कपल्स ना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. प्रत्येकजण आपपला संसार वेगळा थाटतो. बहुतेकदा ते सोइच असत, पण वेगळ रहिल्यावर जवाबदारी दोघांवर असते. रेंट किवा emi, मेंटेनेंस , किराना सामान, आउटिंग , शॉपिंग , गेट टुगेदर ,पेपर,दूध, फ़ोन बिल , लाइट बिल,घरी कामला बाई असेल तर ते एक  .... या सगळ्यासाठी दोघांना कमावण भाग आहे. ऑफिस मधली जीवघेणी रैट रेस तर असतेच. "वेळ मिळत नाही. " खर आहे. आपणच आपल्या आयुष्याचा गुंता इतका वाढवला आहे की तो आता सुटता सुटत नाहीये.           नवरा बायकोच आयुष्य समांतर रेषा बनलय , ऐकमेकासोबत पण आपापल्या रस्त्यांवरून. संगत आणि सोबत यात फरक आहे, नाही का? आजकल एकमेकासंगे पेक्षा एकमेकांसोबत जास्त सोईच झालय. we need our space.  आपण एकसाथ चालतो, हसतो, रडतो, वेळप्रसंगी रागावतो  सुद्धा . आपण एकत्र येतो  सुख अनुभवतो आणि त्यानंतर आपण हे आपण होवून जातो. तू तुझ्या बाजूला मी माझ्या.  आपली पिढी खूप प्रक्टिकल आहे. कोणाच्यात किती गुंतायच हे फार चांगल कळत. म