Skip to main content

समांतर रेषा

समांतर रेषा
         "आमच आयुष्य समांतर रेषा बनून राहिलय." अंशु फोन वर असच काहीतरी बोलली.
आजच्या बिजी सिटी लाइफ मधे कपल्स ना एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. प्रत्येकजण आपपला संसार वेगळा थाटतो. बहुतेकदा ते सोइच असत, पण वेगळ रहिल्यावर जवाबदारी दोघांवर असते. रेंट किवा emi, मेंटेनेंस , किराना सामान, आउटिंग , शॉपिंग , गेट टुगेदर ,पेपर,दूध, फ़ोन बिल , लाइट बिल,घरी कामला बाई असेल तर ते एक  .... या सगळ्यासाठी दोघांना कमावण भाग आहे. ऑफिस मधली जीवघेणी रैट रेस तर असतेच. "वेळ मिळत नाही. " खर आहे. आपणच आपल्या आयुष्याचा गुंता इतका वाढवला आहे की तो आता सुटता सुटत नाहीये. 
         नवरा बायकोच आयुष्य समांतर रेषा बनलय , ऐकमेकासोबत पण आपापल्या रस्त्यांवरून. संगत आणि सोबत यात फरक आहे, नाही का? आजकल एकमेकासंगे पेक्षा एकमेकांसोबत जास्त सोईच झालय. we need our space. आपण एकसाथ चालतो, हसतो, रडतो, वेळप्रसंगी रागावतो  सुद्धा . आपण एकत्र येतो  सुख अनुभवतो आणि त्यानंतर आपण हे आपण होवून जातो. तू तुझ्या बाजूला मी माझ्या. आपली पिढी खूप प्रक्टिकल आहे. कोणाच्यात किती गुंतायच हे फार चांगल कळत. मग काही मोठी माणस आपल्या पिढीला रुड किवा आगउ समझते. "जनरेशन गैप ". आपण समांतर रेषेत चालतो कारण तस राहिलो तर आपल रिलेशन मेन्टेन ठेवू शकतो. आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप आपल्याला आवडत नाही. आपण आपली पर्सनल एंड पब्लिक लाइफ सतत वेगळी ठेवू पाहतो. बहतेकदा हा प्रयन्त फसतो सुद्धा. पण असो. एकमेकांसोबत राहूनही आपली वेगळी वाट शोधू पाहतो. आपली वेगळी जागा बनवू पाहतो. कधी या दोन रेषेत शर्यत असते, पुढे जाण्याची. वरचढ होण्याची.  तशीच गरज असते कधीतरी एखादया ने माघार घेण्याची.  कारण शेवटी जायचय एकाच ठिकाणी. मग सोबत चला किवा संगत. 
          या समांतर रेषा म्हणे अनंतात एकत्र येतात. जस क्षितिजवर पृथ्वी आणि आकाशाच मिलन होत, तसच काही.   शेवटी प्रश्न हा दृष्टिकोनचा आहे. नाही का?

Comments

Popular posts from this blog

गरज

  गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity .  महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल ..  चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ...  माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर.     खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या MIL ना (mother in law हो ! )  शहरात नवीन काही
हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. . 

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी"       माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ...       शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. एक वेगळीच मजा असते एक वेगळच  आपलेपण असत, आणि अचानक मन लहानपणी च्या आठवणीत रमायला लागत. आठवण