Skip to main content

शांती उधार हवी आहे.

    रोजच्या बिजी शेडूल (ओर यु कैन से स्केडुल) मधे आम्हाला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. मला वेळ असेल तर आमचे नवरोजी बिजी आणि त्याला वेळ असेल तर... (एक्चुअली तो नेहमीच बिजी असतो )   तर मुद्दा हा आहे की वेळात वेळ काढून शनिवार-रविवार कैम्पिंग ला जाण्याचा plan आम्ही ठरवला . मग काय  झाली पैकिंग ला सुरुवात टेन्ट ,गॅस शेगडी, बेडिंग , barbeque ,खाण्याच सामान , ड्रिन्किंग वॉटर ,कैमरा , फिशिंग रॉड,  स्वताचे कपडे आणि "रिकाम केलेल मन... नविन आठवणींन साठी" 
     माझ सामान जरा जास्तच असत कारण कॉमन आहे मी मुलगी आहे (लोल.... मराठीत फार वीयर्ड वाटत लोल बोलायला असो ) मॉइस्चराइजर पासून ते ओडोमास पर्यंत चा विचार करते मी. यू नेवर नो कधी काय लागेल.त्याउलट आमचे नवरोजी दोन कपड्यात बैग पैक... wow ... 
     शनिवार आला. सामान गाडीत ठेवल आणि निघलो, शांतीच्या शोधात. अर्ध्या पाउण तासात इमारतींची गर्दी संपून, हाईवे ला टाटा करून छोट्या रस्त्याला लागलो.  शहरांकडून गावकडे जाणाऱ्या रस्त्यांच मला नेहमीच आकर्षण वाटत आलय. एक वेगळीच मजा असते एक वेगळच  आपलेपण असत, आणि अचानक मन लहानपणी च्या आठवणीत रमायला लागत. आठवणींच मोंताज दिसू लागत. सिटी मधे अनेक विनवण्या करूनही कधीही गाडीची काच खाली न करणारा माझा नवरा अश्या शांत रस्त्यांवर न चुकता काच खाली करतो. गार वारा आत येत होता.  मला स्पर्श करणारा हा गार वारा जणू माझ स्वागत करत होता. अचानक आळस निघून गेला आणि  मी गाडीच्या खिड़कीवर हात टाकून रेंगाळले, त्यात च  कधी झोप लागली कळलच नाही. आर्चिस  सोबत असला की मला फार रिलेक्स वाटत खुप सेफ. म्हणूनच कदाचित तो ड्राइव करताना मला छान झोप लागते. तासभरात आम्ही पोहोचलो .  
"बेबी ऊठ, आपण पोहोचलोय "
"काय ?? " डोळे चोळत मी उठले आणि समोरच दृश्य पाहून थक्क झाले .  
"ओह माय गॉड , वेअर आर वी ? इन हेवन ?"
"अम.... यू केन से लाइक देट. "  
अचानक मी एक फुटकळ कविता ऐकवली 
"छोटे छोटे डोंगर 
डोंगरामधे पाणी आणि  
पाण्याच्या बाजूला आम्ही ....  "
"व्हाट्स युवर प्लान हनी ??" नवरोजी म्हणाले. 
 आणि आम्ही हसयला लागलो.  बाष्कळ कविता करण्यात आम्ही एक नंबर आहोत. १० मिनिटांच्या वॉक नंतर आम्ही एक्चुअल लोकेशन वर पोहोचलो.  ती जागा अप्रतिम होती. ब्यूटीफुल , अनटच , लोनली आणि कमालीची फ्रेश. एवढ्या मोठ्या जागेवर डोंगरामधे आम्ही किती छोटे दिसत होतो. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज येत होते. सुंदर पक्षी दिसत होते. मधेच लंगूर ओरडत होता. आयुष्यात किंगफ़िशर चा थवा पहिल्यांदाच पहिला. तिथल पाणी स्वछ आणि शुद्ध दिसत होत. सनलाइट जायच्या आत आम्ही टेन्ट लावून घेतला.बेडिंग लावल.  barbeque ची अरेंजमेंट केली. आणि पाण्यांत उड्या मारल्या. मनसोक्त डुम्बलो, आणि नेहमीप्रमाणे नवरोजी फिशिंग करत बसले आणि मी कॉफ़ी च्या मगासोबत पुस्तक वाचत.
सुंदर संध्याकाळ , कमालीची शांती 
ना हॉर्न चा आवाज, ना माणसांची गर्दी 
ना फोनची रिंग, ना डोर ची बेल 
ना माझा आवाज ना तुझा
आवाज फ़क्त शांततेचा .
शांत संध्याकाळ ,
तुझी ही संध्याकाळ माझ्यावर उधार राहील 
म्हातारपणात या आठवणींचा मला आधार होईल. ( पुन्हा एक.... लोल ) 
    छान सनसेट पहिला. अंधार पडायला लागला. प्रथेप्रमाणे नवरोजिना आजही एकही मासा मिळाला नाही. (लोल) barbeque  पेटवला मस्त मैरिनेट करून आणलेले पनीर , बटाटे आणि बरच काही लावल त्यावर. अंधार जसजसा वाढत होता तसतस चाँदण दिसायला सुरुवात झाली. पहिले दोन तीन आणि अचानक हजारो नाही लाखो किवा त्याहून अधिक.  हे सार माझ्यासाठी इतक नव होत.शहरातच लहानाचे मोठे झाले म्हणून हे कधी अनुभवलच नाही. चाँदण्या मोजता येत नाहीत हे पुस्तकी वाचून होते, पण आज प्रत्यक्षात पाहून नवलच वाटल.  चाँदण्या मोजत पडलेलो आम्ही दोघ एखाद्या मुव्ही च्या शॉट पेक्षा भारी दिसत होतो. फेब्रुवारी चालू असल्याने चांगलीच ठंडी पडली होती. कूडकूडणारी. मस्त गप्पा मारत जेवण संपवल. आजच डिनर खऱ्या अर्थाने कैंडल लाइट होत तेही  चाँदण्यात. सुखद शेकोटीची ऊब, आपली आवडती  व्यक्ती, आणि खूप गप्पा , गप्पा आमच्या पास्ट बद्दल, येणाऱ्या फ्यूचर बद्दल, कामाबद्दल, काही गॉसिपिंग, अजुन अस्तित्वात नसलेली आमची मूल आणि नातवंड सुद्धा...... ही वेळ संपुच नये किवा इथेच थांबवी अशी संध्याकाळ होती. त्यारात्रीइतकी शांत झोप मला या आधी कधीच लागली नव्हती.   
      दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या किलबीलाटानी  जाग आली. चांगलच गार वाटत होत. वळून पाहते तर आर्चिस गायब.  टेन्ट मधून डोकवून पहिल तर तो कॉफ़ी करत होता. ( त्याची ही गोष्ट मला फार आवडते शक्य तेव्हा तो माझ्यासाठी चहा किवा कॉफ़ी बनवण्याचे कष्ट घेतो. ) धुकं पडल होत. पानांवर दव साचल होत. थंडी वाजत होती. नाकातोंडातून वाफा येत होत्या. 
"गुड मॉर्निंग...  झाली का झोप  बाळाची ?" तो म्हणाला. 
" हो. हैप्पी मॉर्निंग बेबी "
पाण्यापाशी वेगवेगळे पक्षी आले होते. हळूहळू सूर्य वर येत होता.सकाळचा उबदार सूर्य त्याची लाली पसरवत होता. तिथेच एक दगडावर बसले. सूर्याचे प्रतिबिंब  जिथे पाण्यात पडले होते तो भाग सोन्यासारखा लखलखत होता.किती ते निरागस सुंदर रूप. आणि किती ती प्रसन्नता. डोळे मिटून सार आठवणीच्या कप्प्यात भरत होते. मी हे सगळ मनात साचवत होते. हावरटा सारखी.  मी हे सार मिस करणार होते. मी त्या निसर्गाला विचारत होते, कुठून आणता हे रूप? कुठून आणता ही शांती? मलाही देता का जरा ही शांती? मला ही शांती उधार हवी आहे, आयुष्यभरासाठी. 
   उन्ह चढायच्या आत निघयाच होत. कालपासून जमवलेल  सार मनात पैक करायच होत. मांडलेला पसारा आवरत जड मनाने परतीचा प्रवास सुरु केला. पाउले निघत नव्हती पण जाण भाग होत. थोडक्यातच मज्जा असते. नाही का? निघालो परत सिटी लाइफ कडे.
शेकोटी 

ऑसम  संध्याकाळ (सन सेट)

                                    लोकेशन

टेन्ट आणि मी 

                                      डेट्स मी

सकाळचा सूर्य 

हॅप्पी मी  ☺

Comments

Popular posts from this blog

गरज

  गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity .  महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल ..  चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ...  माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर.     खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या MIL ना (mother in law हो ! )  शहरात नवीन काही
हॅलो ☺      लाइफ  इन द सिटी हा ब्लॉग म्हणजे माझ्या  आयुष्यातील  खिडकी म्हणा हव तर. .