गरज. . . . कालच आमच्या इथे नविन मॉल झाला. त्यात hypercity . महीना संपत आला होता , महिन्याचे सामान भरायचे होते. एरवी महिन्याच सामान अर्ध "डी मार्ट" मधून आणि अर्ध नेहमीच्या किराणा वाल्याकडून आम्ही भरायचो. महिन्याच सामान बजेट मधेच बसवणारे आम्ही अप्पर मिडल क्लास मधे कधी कन्वर्ट झालो ते कळलच नाही. गरजा वाढत आहेत किवा आम्हीच वाढवत आहोत.डोंट नो. चौकोनी कुटुंबाला अस किती लागत असेल? रोजच्या तेलाच्या जागी ऑलिव ऑइल, रिफाइंड ऑइल सॅलड साठी वेगळ ऑइल .. चार बिस्किट्स च्या ऐवजी डाइट वाली ,चॉकलेट वाली,क्रीम वाली ,कुकीज़ आणि काही फक्त सुंदर पैकिंग असते म्हणून .. डाळ , तांदूळ तर नेहमीचच पण त्यातही ब्राउन राइस, आर्गेनिक राइस ,बासमती , पोलिश डाळ , अनपोलिश, आर्गेनिक डाळ... माझ्या लहानपणी साधा ब्रेड मिळायचा आता ब्राउन ब्रेड , सैंडविच ब्रेड , जिंजर गार्लिक लौफ आणि न जाणे काय काय .. साध मिठच्या जागी पिंक साल्ट , ब्लैक साल्ट एवढच नाही तर फ्लेवर साल्ट (yes am serious ) साबण आणि शैम्पू बद्दल मी न बोललेलच बर. खरच ही आपली गरज आहे की हव्यास ? माझ्या M...